आमचे ध्येय म्हणजे येशूकडे घेवूण जाणारी एकिकृत कथा म्हणून लोकांना पवित्र शास्त्राचा अनुभव घेण्यास मदत करणे.
व्हिडिओ
वाचन योजना
बायबल प्रोजेक्ट बद्दल

बायबल प्रोजेक्ट ही अमेरिकेत स्थित, विना-नफा तत्वावर चालणारी संस्था आहे जी जनसहभागातुन उभारलेल्या निधी वर चालते. पवित्र शास्त्र हे येशूकडे घेवूण जाणारी एकिकृत कथा म्हणून लोकांना अनुभवता यावे अशी संसाधने आम्ही बनवतो. पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास उत्सुक असलेल्यास पवित्र शास्त्रातील क्लिष्ट विषयांना स्पष्ट आणि सुलभरित्या उपलब्ध करणे हे आमचे ध्येय आहे. जागतिक मंडळीला ध्यानात ठेवून आम्ही सर्व संसाधने बनवतो. आमचे विद्वान जरी वेगवेगळ्या ख्रिस्ती परंपरांमधून असले तरी पवित्र शास्त्राच्या एकिकृत कथेला जास्ती जास्त लोकांना अनुभवता यावं यासाठी ते एकजुट रित्या वचनबद्ध आहेत.
आच्या कथेची शुरूवात २०१४ मध्ये झाली जेव्हा दिर्धकाळापासुन मित्र असलेले डॉ टिम मॅकी आणि जॉन कॉलिन्स यांनी पवित्र शास्त्रातील अभ्यास आणि दृष्टात्मक कथाकथन एकत्रित करून, लोकांना पवित्र शास्त्र समजण्यासाठी मदत करणारे इग्रेजी भाषेमध्ये विनामूल्य व्हिडियो तयार केले. तेव्हा पासून बायबल प्रोजेक्ट वाढत गेली आणि १४० हून अधिक लोकांची संस्था झाली आहे. ह्या मध्ये जगभरातील मूळ भाषिकांच्या आणि संधांच्या सहकार्या द्वारे ५० हून अधिक भाषा आणि बोलीभाषांमध्ये हजारो व्हिडियो प्रसिद्ध केले गेले आहे. आमचा पवित्र शास्त्राकडे पाहाण्याचा दृष्टिकोण तुम्ही येथे समजून घेवू शकता.
तुमच्यासारख्या उदार समर्थकांच्या समुदायामुळेच आम्ही बनवलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला विनामुल्य उपलब्ध करता येते.






